कुंभोज ( विनोद शिंगे)
भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान* देशभरात अतिशय उत्साहात सुरू आहे. या निमित्ताने भाजपा शहर मध्यवर्ती कार्यालय, इचलकरंजी येथे आयोजित सदस्यता नोंदणी अभियान प्रदेश कार्यशाळा अत्यंत यशस्वीपणे पार पडली.
या कार्यशाळेला माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे, तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर प्रमुख उपस्थित होते.