‘सतेज कृषी प्रदर्शना’ला तपोवन मैदानावर सुरवात

कोल्हापूर : ‘सतेज कृषी प्रदर्शना’ला शुक्रवार(२७)पासून तपोवन मैदानावर सुरवात झाली.

 

यावेळी देशाच्या अर्थिक सुधारणांचे प्रणेते, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना आदरणीय खासदार शाहु छत्रपती महाराज यांच्यासह आ.सतेज पाटील आणि आमदार जयंत आसगांवकर यांच्या उपस्थितीमध्ये श्रध्दांजली वाहून त्यांच्या शेतकरी आणि कृषीविषयक अर्थिक धोरणांना अभिवादन केले.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी विविध कृषी कंपन्यांचे प्रतिनिधी आणि राज्यभरातील शेतकरी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, विजय देवणे, सुनिल मोदी तसेच गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे, संचालक विश्वास पाटील (आबाजी), डॉ. चेतन नरके, बाळासाहेब खाडे, बाबासो चौगुले, बयाजी शेळके, कर्णसिंह गायकवाड, अमर पाटील, राहुल देसाई, दलितमित्र व्यंकपा भोसले, कॉ. उदय नारकर, कॉ. सतीशचंद्र कांबळे, आर. के. मोरे, गोपाळराव पाटील, प्रकाश पाटील, शिवाजीराव पाटील, पी. डी. धुंदरे, सदाशिव चरापले, धीरज डोंगळे यांच्यासह शामराव देसाई, बजरंग पाटील, जीवन पाटील, बाळासाहेब सरनाईक, सचिन घोरपडे, विनोद पाटील, धिरज पाटील, कुमार अहुजा, सत्यजित जाधव,, उदयानी साळुंखे, स्मिता गवळी, श्रुतिका काटकर, यांची उपस्थिती होती.

🤙 9921334545