भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात

कोल्हापूर: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा 99 वा वर्धापन दिन कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील कम्युनिस्ट पक्ष ऑफिसमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीला कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविक करून एकनाथ पवार यांना लाल ध्वजाचे आरोहण करण्याचे आवाहन केले, आणि 81 व्या वर्षी सुद्धा कम्युनिस्ट पक्षात कार्यरत असणाऱ्या सत्कारमूर्ती बी एल बर्गे आणि एकनाथ पवार यांची ओळख करून दिली. त्यानंतर दिलीप पवार यांनी सत्कारमूर्तींचा सत्कार केला.

 

 

कार्यक्रमासाठी सुभाष सुतार, मीना चव्हाण, गंगुबाई पाटील, सतीश कांबळे, रेखा पवार, उमेश पवार, प्रभंजन चव्हाण, मुल्ला भाभी, कोमल खेतल, रंजना खोत, सर्जेराव पाटील, कलकुटगी, सुभाष शेटे, बाबा ढेरे, दिलदार मुजावर, जैनुद्दीन पन्हाळकर, निवास नलवडे, चंद्रकांत बागडी, रमेश वडणगेकर, कुंभारबाई, सुभाष गवळी,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545