कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके यांनी भाजप जिल्हा मुख्यालयाला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. माझ्या या विजयामध्ये महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या भाजपा पक्षाचा, पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा देखील मोठा वाटा असल्याचे नरके यांनी सांगितले. यावेळी जिल्हा भाजपा पदाधिकार्यांच्या मार्फत आमदार पदी निवडीबद्दल नरके यांचा सत्कार करण्यात आला.
नरके म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर अमित शाह, एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या दौऱ्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह वाढला आणि प्रत्येकजन कामाला लागला. याचा परिपाक म्हणूनच कोल्हापूरमध्ये संपूर्ण १० आमदार महायुतीचे निवडून आले. यामध्ये महायुतीच्या सर्व घटक पक्षांची असणारी एकजूट निर्णायक ठरली. करवीर मतदार संघासह कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर असेन, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील अशाच एकजुटीने काम करू असे आवाहन सर्वांना केले.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते मांडली. भाजपा जिल्हाप्रमुख नाथाजी पाटील बोलताना म्हणाले कि, २०१९-२४ या काळात चंद्रदीप नरके साहेब आमदार नव्हते पण त्यांनी जनतेशी संपर्क कधी तुटू दिला नाही. आमदार नसताना देखील मतदार संघात विकासकामे खेचून आणली. त्यांची ही बाब विधानसभा निवडणुकीत नक्कीच सकारात्मक ठरली.
याप्रसंगी भाजपा जिल्हाप्रमुख नाथाजी पाटील. करवीर विधासभा भाजप प्रमुख हंबीरराव पाटील, करवीर तालुका प्रमुख दत्ता मेडसिंगे, पन्हाळा तालुका प्रमुख मंदार परितकर, गगनबावडा तालुका प्रमुख स्वप्निल शिंदे, संदीप पाटील, संभाजी पाटील (नाना), शिवाजी पोवार, अनंत गुरव, भगवान काटे, अजय चौगुले आदींसह इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.