कोल्हापूर: हुपरी येथे एसटी बसने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवर मागे बसलेल्या स्मिता चंद्रकांत पाटील (वय 32, रा. इंगळी) या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हुपरी येथील श्री अंबाबाई मंदिर पूर्व कमानी समोर मुख्य रस्त्यावर झाला.
स्मिता या हुपरी येथे कामानिमित्त आल्या होत्या.मोटरसायकल त्यांच्या शाळेचा शिपाई वैभव जाधव हा चालवत होता. परत जात असताना हुपरी माळ भागावरून भरधाव आलेल्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली.
यामध्ये स्मिता पाटील यांचे डोके रस्त्यावर आदल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये वैभव जाधव हा ही जखमी असून त्याला उपचारासाठी कोल्हापूरमध्ये दाखल करण्यात आले आहे. एसटी चालक विनायक दिनकर चौगुले (रा.चिमगाव, ता.कागल) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.