शेतकऱ्याने नितेश राणेंच्या गळ्यात घातली कांद्यांची माळ; कांदा दरामधील मोठी घसरणीमुळे शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी

नाशिक : देशभरात कांदा दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे .नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मंत्री नितेश राणे आले असता. तेथील संतप्त शेतकऱ्याने भर सभेत राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली. त्यानंतर त्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

 

 

त्यावेळी राणे यांनी “शेतकऱ्याला थांबवा, त्यांच्या समस्या ऐकून घेऊ”असे सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यास सरकार कटिबंध असून, आपण शासन दरबारी प्रश्न मांडू असेही आश्वासन मंत्री राणे यांनी दिली.

सध्या नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. पंधरा दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाले आहे.कांद्याला सरासरी 1,900 रुपयांचा दर मिळत आहे. जास्तीत जास्त दर हा 2,800 रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.