शिरोली येथे दारूच्या नशेत बसवर दगडफेक

कुंभोज  (विनोद शिंगे)
शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील दिल्ली दरबार हॉटेल जवळ एका व्यक्तीने दारूच्या नशेत बसवर दगडफेक केल्याने बसमधील तीन प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले.

कोल्हापूरहून शिरोली माळवाडी व पेठवडगाव कडे निघालेल्या केएमटी बसवर नागेश अर्जुन वाईडे (रा. जालना) याने दारूच्या नशेत दगडफेक केल्याने बस मधील राहूल सुनीलकुमार चोपडे (वय २५ ,रा.भादोले), संचिता नितीन कांबळे (वय १७) स्नेहल सुनिल कांबळे (वय २१) हे तिघे प्रवासी गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर प्राथमिक उपचारासाठी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहूल हा भादोले गावचा रहिवाशी असून तो कामानिमित्त कोल्हापूर येथे गेला होता आपले काम उरकून तो पेठवडगाव केएमटी बसने गावाकडे जात होता.