कुंभोज (विनोद शिंगे)
एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे मंगळवार २४ डिसेंबर रोजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी साने गुरुजी जन्मजयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे,उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी यांच्या फोटोचे प्रतिमापूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सुदर्शन चौगुले यांनी केले.
विद्यार्थिनी मनोगत मनस्वी भंडारी हिने सानेगुरुजींच्या बद्दल थोडक्यात सांगितली. प्रमुख वक्ते अशितोष व्हनवाडे यांनी साने गुरुजींनी महाराष्ट्राची आणि देशाची नवी पिढी घडावी म्हणून साहित्याची निर्मिती केली. श्यामची आई नावाचं मातृप्रेमाचं मंगल स्त्रोत लिहिलं. सर्वधर्मसमभाव,समाजवाद आणि सेवादल यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे सर्व अध्यापक,अध्यापिका,विद्यार्थी उपस्थित होते.आभार सुजाता पाटील यांनी केले.सूत्रसंचालन वैशाली जुगळे यांनी केले.