सांगरूळ शिक्षण संस्थेच्या 52 व्या विज्ञान प्रदर्शनास आ. चंद्रदीप नरकेंची भेट

कोल्हापूर : “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान”, हे ब्रीदवाक्य घेऊन आज शिक्षण विभाग पंचायत समिती करवीर व सांगरूळ शिक्षण संस्थेच्या सांगरूळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सांगरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या 52 व्या विज्ञान प्रदर्शनास आमदार चंद्रदीप नरके यांनी भेट दिली. 22 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2024 असा या विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे.

 

 

यावेळी मुलांनी फुलांचा वर्षाव करत नरके यांचे स्वागत केले. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांमधील विज्ञान व तंत्रज्ञानाबाबतची आवड वाढून, बलशाही भारतासाठी नव्या पिढीतील संशोधक तयार व्हावेत अशा यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी यावेळी अध्यक्ष य. ल.खाडे काका, कुंभी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन राहुल खाडे, व्याख्याते अनिल चौगुले, प्रा. बी. एम. नाळे, बापूसो लोंढे, समरजीत पाटील  (गटशिक्षणाधिकारी करवीर), बी.के.पाटील, आर.जी. खाडे सर, एस. डी.पाटील सर आदी प्रमुख उपस्थित होते. याशिवाय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545