‘आविष्कार’मध्ये राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी विजेते

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात पार पडलेल्या दोनदिवसीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये आज कासेगाव येथील राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीने विजेतेपद पटकावले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

 

 

 

शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचे उद्दीष्ट बाळगून दरवर्षी आविष्कार संशोधन महोत्सव आयोजित करण्यात येतो. जिल्हास्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेच्या फेऱ्यांनंतर विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सव राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पार पडला. विद्यार्थी विकास विभाग आणि रसायनशास्त्र अधिविभागातर्फे महोत्सवाचे संयोजन करण्यात आले.

पदवी स्तरीय, पदव्युत्तर स्तरीय आणि पीएच.डी. संशोधन स्तरीय अशा तीन गटांमध्ये संशोधकांनी या दोन दिवसांत आपले प्रकल्प पोस्टर व मॉडेल्सच्या स्वरुपात सादर केले. मानव्यशास्त्र, भाषा आणि कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा, शुद्ध विज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय आणि औषधनिर्माण या सहा श्रेणींमध्ये संशोधक विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादरीकरण केले.

काल झालेल्या पदव्युत्तर गटातील स्पर्धेमध्ये १९३ संशोधक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यांचा निकाल गटनिहाय अनुक्रमे पुढीलप्रमाणे:

मानव्यशास्त्रभाषा व ललित कला: १. साक्षी किरण दाताळ (औद्योगिक रसायनशास्त्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), २. सुशांत केदारी पाटील (संख्याशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), ३. अनुष्का महेश कारंडे (राज्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ) ४. प्रियांका सुरेश ढेबे (किसन वीर महाविद्यालय, वाई), ५. मुकेश सर्जेराव हक्के (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी),

वाणिज्यव्यवस्थापन आणि कायदा: १. आदित्य संदीप बरगे (डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगाव) २. साक्षी राजेंद्र शेडगे (लालबहादूर शास्त्री कॉलेज,सातारा) ३. भार्गवी विजय कुंभार (कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पलूस) ४. वैष्णवी धनाजी पाटील (श्री शिव शाहू महाविद्यालय, सरुड), ५. महेश मनोहर मोरे (संख्याशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ)

शुद्ध विज्ञान: १. ओंकार संजय सुतार (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर), २. सुषमा राजीव देशमुख (जैवतंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ),  ३. राजशेखर अर्जुन यादव (औद्योगिक रसायनशास्त्र,शिवाजी विद्यापीठ), ४. स्वप्नील विकास पाटील (यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय, कराड), ५. नंदिनी प्रमोद डोळसे (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड),

कृषी आणि पशु विज्ञान: १. गजानन गणेश देशमाने (आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, सांगली), २. तनुजा शिवाजी कदम (डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी महाविद्यालय, कसबे डिग्रज), ३. ज्ञानेश्वर महादेव माने (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर), ४. सत्यम प्रकाश पाटील (एस. जी. एम. कॉलेज, कराड), ५. ओंकार प्रकाश पाटील (जैवतंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ),

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान: १. शौनक आनंद बेले (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव), २. ऐश्वर्या दिलीप सास्ते (सायबर, कोल्हापूर), ३. काजल संजयकुमार अत्रि (सायबर, कोल्हापूर), ४. क्रांती अर्जुन देशमुख (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर) ५. प्रीती दगडू कोचाळे (किसन वीर महाविद्यालय,वाई)

वैद्यकीय आणि औषध निर्माण: १. सेजल शिदगोंडा खटकी (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव), २. प्रसाद दिलीप कोळी (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर), ३. आकांक्षा रामचंद्र मोरे (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव),  ४. पूजा बाळू पुजारी (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर), ५. मानसी मनोहर जाधव (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर).

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रसायनशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कैलास सोनवणे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले, केंद्रीय समन्वयक डॉ. डी.एच. दगडे, स्पर्धा समन्वयक डॉ. दत्तप्रसाद पोरे, डॉ. डी.एस. भांगे, डॉ. एस.एन. तायडे यांच्यासह रसायनशास्त्र अधिविभागातील सर्वच शिक्षक, प्रशासकीय सेवक यांनी परिश्रम घेतले.