मुंबई : जीएमआरटी प्रकल्पामुळे पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिली.
जीएमआरटी प्रकल्प अभिमानास्पद असला तरी त्यामुळे या भागाच्या विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा बळी देणं आम्हाला मान्य नाही. म्हणूनच रेल्वे प्रकल्पाला घेतलेल्या आक्षेपांबाबत जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांनी तांत्रिक तोडगा काढावा किंवा जीएमआरटी प्रकल्प विरळ लोकसंख्या असलेल्या भागात स्थलांतरित करावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधानांचे कार्यालय आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यंच्याकडे केली.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा शिरूर लोकसभा मतदारसंघासह पुणे व नाशिक जिल्ह्याच्या विकासाला नवसंजीवनी देणार आहे, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असून हा संघर्ष रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास जाईपर्यंत सुरूच असणार आहे.असे अमोल कोल्हे म्हणाले.