कुंभोज (विनोद शिंगे)
रुकडी गावाचे सुपुत्र सुनिल मारुती भारमल यांना इंडियन पोलीस मित्र ह्याच्या मार्फत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन 2024 चा “कर्तृत्वान व्यक्तीचा राष्ट्रीय पुरुस्कार “हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल रुकडी गावाचे लोकनियुक्त सरपंच सौ. राजश्री संतोष रुकडीकर ह्याचे हस्ते आज रुकडी ग्रामपंचायत मध्ये सत्कार करण्यात आला.
त्यावेळी बोलताना मा ,.उप सरपंच शीतल खोत,सौ राजश्री संतोष रुकडीकर ह्यांनी सामाजिक क्षेत्रात कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवाभावी वृत्तीने सतत कार्यरत असणाऱ्या श्री.सुनिल भारमल ह्याच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे रुकडी गावाच्या नावालौकिकात भर पडत असून आपल्या मार्फत असेच सामाजिक कार्य घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली.सदर सत्कार समारंभास उपसरपंच सौ मालती दिलीप इंगळे व ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.