कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ;आरोग्य विभाग हादरले

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील फुलेवाडी, बुधवार पेठ तसेच जोतिबा डोंगर(ता.पन्हाळा)येथे जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून अवैद्य गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला.

 

 

 

या कारवाईत बोगस डॉक्टर, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दगडू बाबुराव पाटील (45, रा. राजलक्ष्मी नगर देवकर पाणंद) ,गजेंद्र बापूसो कुसाळे (37, रा.शिरसे, ता.राधानगरी) व बजरंग श्रीपती जांभिलकर(31, रा. महाडिकवाडी, ता. पन्हाळा) या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी काल(गुरुवार)रात्री अटक केली.

फुलेवाडी येथील तिसरा बस स्टॉप परिसरात डॉक्टर डी. बी पाटील यांनी ‘प्रतीक्षा’नावाची क्लिनिक आहे .या क्लिनिकमध्ये अवैध्य गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी दुपारी डॉक्टर पाटील यांच्या रुग्णालयावर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर रुग्णालयाची झडते घेण्यात आली. या तपासणीमध्ये पथकाला संशयास्पद औषधे सापडली. यामध्ये काही मुदतबाह्य औषधांचा तसेच उत्तेजित औषधांचा साठा आढळून आला. काही इंजेक्शनसह बनावट प्रमाणपत्र ही पथकाच्या हाती लागली.

या कारवाईनंतर पथकाने चौकशी केली असता, बुधवार पेठेतील एका भाड्याच्या घरात सोनोग्राफी मशीन ठेवण्यात आल्याचे समजले. त्यानंतर तेथील सोनोग्राफी मशीन पथकाने जप्त केलं.यानंतर डॉक्टर पाटील यांचे जोतिबा डोंगर येथेही रुग्णालय असल्याची माहिती मिळाली. जोतिबा डोंगर येथे जाऊन पथकाने त्या रुग्णालयावर ही छापा टाकला या ठिकाणी सुद्धा काही औषध संशयास्पद औषध ,कागदपत्रे आढळून आल्याने पथकाने डॉक्टर पाटील यांच्यासह जुना राजवाडा पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आली.

यामागे मोठी टोळी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णांचा शोध घेणे, त्यांची तपासणी करणे आणि आवश्यकता वाटल्यास गर्भपात करणे यासाठी मोठे कमिशन देऊन लोकांना सहभागी करून घेतले जात असावे, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

🤙 9921334545