कॅबिनेटमंत्री प्रकाश आबिटकर यांचे राधानगरी मतदार संघात जंगी स्वागत करूया – भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

गारगोटी :प्रकाश आबिटकर हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या राधानगरी विधानसभा मतदार संघात शनिवार (दि.21) रोजी येत असून त्यांचे मतदार संघामध्ये जंगी स्वागत करूया असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील यांनी केले. ते गारगोटी (ता.भुदरगड) येथे नियोजनासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलत होते.

 

7

 

 

 

महायुतीचे दोन्ही मंत्री नाम.हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर हे कोल्हापूर येथे सकाळी 10 वाजता येणार असून ताराराणी चौक, कावळा नाका येथे जंगी स्वागत होणार आहे. तसेच ताराराणी चौकातून कोल्हापूर येथील रॅलीस सुरवात होणार असून महापुरषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पन करून अभिवादन करणार आहेत. यानंतर अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापूर येथील रॅलीची सांगता शाहू महाराजांच्या समाधिस्थळाजवळ करणात येणार आहे.प्रकाश आबिटकर यांच्या मतदार संघातील रॅलीची सुरवात शेळेवाडी (ता.राधानगरी) येथून होणार आहे. त्यानंतर गारगोटी-कोल्हापूर या मुख्य मार्गाने ही रॅली गारगोटी शहरात येणार आहे. या दरम्यान तुरंबे येथील गणेशाचे दर्शन घेणार आहे. यानंतर रॅली गारगोटी शहरात येऊन येथील क्रांतीसिंह नाना पाटील व्यासपीठाजवळ नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ता या बैठकीसाठी आले होते.

यावेळी शिवसेना भुदरगड तालुकाप्रमुख संग्राम सावंत यांना उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला त्यास आजरा तालुकाप्रमुख संजय पाटील यांनी दिले यावेळी टाळ्यांच्या गजरात हा ठराव संम्मत झाला.

यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, या विधानसभा निवडनुकीतील विक्रम सांगितले. कोल्हापुर जिल्ह्याला दोन कॅबिनेट आणि भुदरगडचे सुपुत्र नाम.चंद्रकांतदादा पाटील यांना एक कॅबिनेट अशी तीन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत. यामुळे सर्व कार्यकर्त्यांचा व जनतेचा सुवर्णकाळ सुरू झाल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक अर्जून आबिटकर यांनी स्वागताचे नियोजन सांगितले. प्रास्ताविकात कल्याणराव निकम यांनी मंत्रीमंडळ स्थापनेच्या दरम्यान निर्माण झाल्येल्या वस्तूस्थीतीचे कथन केले. आभार बाबा नांदेकर यांनी मानले.

यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, माजी उपसभापती अरुणराव जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबा नांदेकर, बाजार समिती संचालक संदीप वरंडेकर, अशोकराव फराकटे, मदनदादा देसाई, अशोकराव भांदिगरे, अलकेश कांदळकर, सर्जेराव देसाई, अंकूश चव्हाण, दिपक शेट्टी, शिवसेना राधानगरी तालुकाप्रमुख तानाजीराव चौगले, अमित देसाई, दौलतराव जाधव, विद्याधर परीट, सुभाष पाटील मालवेकर, शिवाजीराव ढेंगे, दशरथ अमृते, विलास नाईक, विजय पाटील यांच्यासह प्रमुख मान्यावर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.