नागपूर : नागपुरातील रेशिमबाग. येथे आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवारजी आणि द्वितीय सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी यांना आमदार राहुल आवाडे यांनी विनम्र अभिवादन केले.
राहुल आवाडे यांनी याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या ,ते म्हणाले, या महान विभूतींनी आपले आयुष्य राष्ट्रास समर्पित केले. त्यांच्या प्रेरणेतून आमच्यासारखे लाखो स्वयंसेवक देशकार्यात हिरीरीने सहभागी झाले. यापुढेही हा सेवायज्ञ सुरूच राहील हा संकल्प दृढ करणारा हा क्षण होता. या महापुरुषांपुढे नतमस्तक होताना मनात प्रार्थनेचे शब्द आपोआप उमटत होते… “नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्।”
यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्री तसेच सहकारी आमदार उपस्थित होते.