कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव २०२४-२०२५ चे आयोजन दि. २० व २१ डिसेंबर २०२४ रोजी राजमाता जिजाऊसाहेब सभागृह शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्हयातील महाविद्यालये व शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील ४०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हि स्पर्धा शेती मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान आणि संबंधित विषय, फार्मसी, पोषण, सामाजिक शास्त्र, मानसशास्व, वाणिज्य आणि कायदा, आंतरविद्याशाखा आदी सहा प्रकारात होणार आहे. संपूर्ण देशात संशोधनातील प्रतिभेला प्रोत्साहन देणे, तरूण संशोधकांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी विविध प्रायोजकाच्या सहकायनि आर्थिक आणि भौतिक संसाधने वाढवणे संभाव्य विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी योग्य प्रोत्साहन देणे,
तरूण संशोधकांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी विविध प्रायोजकांच्या सहकार्याने आर्थिक आणि भौतिक संसाधने वाढवणे. संभाव्य विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी योग्य प्रोत्साहन देणे, निवडलेल्या गटामध्ये गहन संशोधन संस्कृती सुरू करणे असा हया स्पर्धेचा हेतू आहे.
सदर स्पर्धेचे उद्घाटन समारंभ दि. २०/१२/२०२४ रोजी सकाळी १०:१० वाजता माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) डी. टी. शिर्के यांच्या शुभहस्ते, मा. प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पी. एस. पाटील, मा. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. टी. एम. चौगुले संचालक, विद्यार्थी विकास विभाग, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख व संचालक हे कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत I
या कार्यकमाचे संयोजक प्रा. डी. एम. पोरे समन्वयक डॉ. एस. एन. तायडे. व डॉ. डी. एस. भांगे सदस्य अविष्कार २०२४-२५. मा. प्रा. के. डी. सोनवणे, प्र. विभागप्रमुख रसायनशास्व विभाग, व रसायनशास्व अधिविभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी आयोजनासाठी सहकार्य केले आहे.