दिल्ली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्या दिल्ली निवासस्थानी अजित पवार यांनी भेट घेतली होती.
या भेटीत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबत इतर राजकीय विषयावर चर्चा झाल्याचे बोलले गेले. त्यानंतर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
या भेटीनंतर पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या त्यावर पंतप्रधानांशी चर्चा केली. राजकीय चर्चा झाली नाही फक्त पाच मिनिटांची भेट होती. असेही त्यांनी सांगितले. साताऱ्यातील दोन डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक प्रयोग करून शेती केली. त्या शेतकऱ्यांसोबत शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली.