भुजबळ समर्थकांचे अजित पवारांच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन

पुणे: भुजबळ समर्थक ओबीसी कार्यकर्त्यांनी पुण्यात अजित पवारांच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन केले. यावरून राष्ट्रवादीतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.जशास तसे उत्तर दिले जाईल. नाही ते उद्योग करणे बंद करा, नाहीतर परिणाम भोगावे लागतील. असा इशारा पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिला आहे.

 

 

 

 

दरम्यान जोडे मारो आंदोलनावर छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसापासून सांगत आहे, अजित पवार यांच्या पुतळ्याला जोडे मारू नका.अपशब्द शब्द वापरू नका. आपल्या भावना शांततेत व्यक्त करा. जे असे करतील ते समता परिषदेचे नाही असे भुजबळ म्हणाले.

🤙 9921334545