मुंबई: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रेसिप्रोकल कर लादण्याची धमकी दिली आहे. भारत अमेरिकन उत्पादनावर जो कर लावतो तोच कर आम्ही भारतीय उत्पादनावरही लावू असं त्यांचं म्हणणं आहे. ट्रम्प दीर्घकाळापासून काही अमेरिकन उत्पादनाच्या आयातीवर भारताने उच्चशुल्क लादण्यास विरोध करत आहेत. याला विरोध म्हणून भारतीय उत्पादनावर शुल्क वाढवण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प म्हणाले, जर त्यांनी आमच्यावर उच्च शुल्क लादले तर आम्ही त्यांच्यावर ही लादू.ते जवळजवळ सर्व प्रकरणांमध्ये आमच्यावर कर लावतात. पण आम्ही सर्व आयतीवर कर लावला नाही. मात्र आता पॉलिसी बदलावी लागणार. भारताने आमच्यावर शंभर टक्के कर लावला तर आम्ही त्यांच्यावर अजिबात कर लावू नये का ?भारत आणि ब्राझील असे देश आहेत जे काही अमेरिकेन उत्पादनावर उच्च शुल्क लावतात. या देशाने जर त्यांच्या करात बदल नाही केला, तर आम्हीही तेवढाच कर त्यांच्यावर लादू असा इशारा ट्रम्प यांनी दिला.