कोल्हापूर : जयसिंगपूर येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली संचलित बळवंतराव झेले हायस्कूल व ज्युनि. कॉलेज जयसिंगपूर मध्ये जिल्हा परिषद,कोल्हापूर,शिक्षण विभाग पंचायत समिती,शिरोळ व बळवंतराव झेले हायस्कूल,जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हे घोषवाक्य घेऊन तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते.
राजेंद्र पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे व गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना पुढील वैज्ञानिक प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन व्हावे, विविध वैज्ञानिक संस्थांच्या भेटींचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तालुक्यातील प्राथमिक,माध्यमिक सर्व शाळांमध्ये आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य आमदार फंडातून देण्यात येईल असे जाहीर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटी चेअरमन गजकुमार मानगावे यांनी आपल्या मनोगतातून विज्ञान प्रदर्शनात सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करत परीक्षकांनी नि:पक्षपातीपणाने उपकरणांचे मूल्यमापन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष जलार्ध्य व विज्ञान गीताने झाली.
स्वागत व प्रस्ताविक भारती कोळी गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती, शिरोळ यांनी केले.याप्रसंगी प्रशालेचे माजी विद्यार्थी व सध्या अमेरिकेत वास्तव्याला असलेले रडार यंत्रणेचे वैज्ञानिक संतोष गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या समारंभासाठी मा.प्रितेश वाघ,उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.कोल्हापूर,दीपक कामत गटविकास अधिकारी,मेघन देसाई,प्रशासन अधिकारी, चुडप्पा सर,परीक्षक,तसेच तालुक्याच्या विविध शाळातून आलेले मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार मुख्याध्यापकआर.व्ही.पाटील यांनी मानले तर निवेदन किरण पाटील व महेश घोटणे यांनी केले.