मनोज जरांगे पाटील यांनी केली पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा!

मुंबई: 25 जानेवारी 2025 ला राज्यभरातील कानाकोपऱ्यातील मराठ्यांनी आपल्या लेकरा बाळांसह अंतरवालीत यावं. मराठ्यांचे भगव वादळ येऊ द्या.असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी करत पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.

 

 

 

अंतरवालीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की ,25 जानेवारीला माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे. पण 24 जानेवारीला गोरगरीब मराठा समाज येथे जमणार आहे. त्यामुळे 25 जानेवारी 2025 च्या आत मराठा समाजाच्या सर्व वागण्या मान्य करा,नाहीतर तुम्हाला गुडघे टेकायला लावणार.25 जानेवारीपर्यंत आरक्षण दिले नाही ,मराठा समाजाची तुम्ही बदनामी केली, तर तुम्हाला सोडणार नाही. असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

मराठा आरक्षण घेईपर्यंत अंतरवालीतून उठायचं नाही. जे लोक आंतरवालीत येणार आहेत.त्यांनी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या घेऊन या. अंथरूण पांघरून घेऊन या. कितीही श्रीमंत असला आणि कितीही गरीब असला तरीही हॉटेलवर जायचं नाही. जेवायला जायचं नाही, पाण्याची व्यवस्था करून घ्यायची गोरगरिबांच्या लढत सामील व्हायचं.

ज्यांना उपोषण करायच आहे त्यांनी करा .ज्यांना नाही करायचं त्यांनी पाठिंबा द्यायला या. घरच्यांच्या विरोधात जाऊन उपोषण करू नका. मी इथं मरायला खंबीर आहे. तुम्ही खूप एकजूट दाखवली. मी समाजाच्या अपेक्षाभंग होऊ देणार नाही. मी कधीच गद्दारी करणार नाही, कधीच मॅनेज होणार नाही. हा माझा शब्द आहे. असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मला आता उपोषण सहन होत नाही. माझा शेवट ही होऊ शकतो. माझा मराठा समाज सांभाळा, मी मागे हटणार नाही. शरीर साथ देत नाही. या उपोषणात माझा शेवटी होऊ शकतो. कुटुंबाला सांगतो मी नसलो तरी समाजासाठी योगदान द्या, लढा कधीही बंद करू नका हे समाजाला आवाहन आहे.