उचगावात मोफत महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर:महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेतून सर्व सामान्य नागरिकांनी आरोग्य योजनांच्या माध्यमातून त्वरित उपचार करून आजाराच्या संकटावर मात करावी. या योजनाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य इरफान मणेर यांनी केले.

 

 

युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग गोकुळ शिरगाव,सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, आयुष्यमान भारत, प्रधान मंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आकाशदीप नेत्रालय, जीवनधारा ब्लड बँक, हाजी आर एस मणेर फाउंडेशन,यांच्या संयुक्त सहयोगाने माजी जिल्हा परिषद सदस्य इरफान मणेर,उचगाव ग्रामपंचायत सदस्य तलहा मणेर यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमातून उचगाव मणेर मळा (ता. करवीर) येथे मोफत महाआरोग्य शिबीर प्रसंगी ते बोलत होते.

मोफत आरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी आकाश दीप नेत्रालय तर्फे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंण पथक सीपीआर व युवा ग्रामीण विकास संस्था ,आरोग्य प्रतिबंध विभाग मार्फत मोफत समुपदेशन व रक्त तपासणी करण्यात आली. क्षयरोग व एच.आय. व्ही/ एड्स विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्तदान शिबिरासाठी युवकांनी मोठा पुढाकार घेतला. या शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी,राज सातपुते, सहिल जमादार , महेश केसरी, आनंद सज्जन, निखिल सुतार, प्रदीप आवळे, यांच्यासह कर्मचारी, पिअर लीडर यांचे सहकार्य लाभले.

प्रास्ताविक प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते यांनी केले. आभार प्रदीप आवळे यांनी मानले.

 

🤙 9921334545