‘एक देश ,एक निवडणूक’ विधेयक सोमवारी लोकसभेत सादर होणार

मुंबई: ‘एक देश ,एक निवडणूक’हे विधेयक केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे सोमवारी (दि.16 )लोकसभेत सादर करतील. लोकसभा आणि देशातील विविध राज्यांमधील विधानसभा निवडणूक एकाच वेळी घेण्यासाठी पहिले दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार आहे दुसरे विधेयक दिल्ली आणि जम्मू काश्मीर आणि पोद्दुचेरीच्या विधानसभाच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आणले जाईल.

 

 

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘एक देश आणि एक निवडणूक’ या विधेयकाला 12 डिसेंबर रोजी मंजुरी दिली होती. आता हे विधेयक सोमवारी सादर केले जाणार आहे.

🤙 9921334545