अभिनेता अल्लू अर्जुनला अटक

मुंबई : 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये साउथ अभिनेता अल्लू अर्जुन च्या ‘पुष्पा टू’ चित्रपटाच्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला . याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन ला हैदराबाद मधून अटक करण्यात आली आहे.

 

 

अल्लू अर्जुन ने या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अल्लू अर्जुन ने या परिवाराला आश्वासन दिले की, “मी नेहमी त्यांच्यासाठी मदतीला असेल, त्यांनीही सद्भावना म्हणून 25 लाख रुपये मदत करत आहे. सिनेमा पाहणाऱ्या साठी आवाहन केला आहे की, थिएटर मधे जाताना सावधान बाळगावी.”

अल्लू अर्जुनने या घटने नंतर तेलंगणा उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. यात म्हटला आहे की या घटनेत आपली कोणतीही चूक नाही त्यावेळी मी दुर्दैवाने तिथे उपस्थित होतो.