कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथेऑन स्क्रिन मार्किग पध्दतीने उत्तरपत्रिका मूल्यमापन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हयातील महाविद्यालयांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सदर कार्यशाळेसाठी विद्यापीठातील अधिविभागप्रमुख, महाविद्यालयातील प्राचार्यव शिक्षक,दूरशिक्षण विभागातील संचालक व शिक्षक तसेच परीक्षा विभागातीलअधिकारी व कर्मचारी हजर होते. ऑक्टो./नोंव्हें. 2024 या हिवाळी सत्रातीलपदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे ऑन स्क्रिन मार्कींग पध्दतीने मूल्यमापन होणारआहे. त्यासाठी आयोजित कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून विद्यापीठ संलग्न
महाविद्यालयातील तसेच अधिविभागातील मूल्यमापनाच्या अनुषंगाने पदव्यूत्तरअभ्यासक्रमांच्या शिक्षकांना आवश्यक ऑनलाईन संगणक प्रणालीची माहिती देण्यात आली. व या मूल्यमापनाच्या कामी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.सदर कार्यशाळेस प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्ययांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान डॉ. अजितसिंह जाधव,मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी भूषविले व ऑन स्क्रिन मार्किंगपध्दतीचे महत्व विषद केले, सदर पध्दतीमुळे परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापनाचेकामकाज बिनचूक होवून निकाल लवकर लागणेस मदत होईल असे नमूद केले.
तसेचऑन स्क्रिन मार्कींग संगणक प्रणालीव्दारे उत्तरपत्रिकांचे मूल्यमापनाचे कामकाज कशापध्दतीने होईल याचे सादरीकरण श्री. श्रीधर लोका, मॅनेजर, मॅग्नेटिक इन्फोटेक,सिकंदराबाद यांनी केले व उपस्थितांच्या प्रश्नांचे निराकरण केले. कार्यशाळेमध्येस्वागत व प्रास्ताविक कॅप विभागाचे उपकुलसचिव श्री. दिपक अडगळे यांनी केले.
आभार प्रदर्शन विभागातील सहा. कुलसचिव श्री. अनिल कृष्णा भेंडेकर यांनी केले.
सूत्रसंचालन श्रीमती एन. डी. पाटील अधीक्षक, कॅप विभाग यांनी केले.