दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाची मोठी घोषणा

दिल्ली: 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. 18 वर्षावरील प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 2100 रुपये जमा केले जातील, अशी घोषणा केजरीवाल यांनी गुरुवारी केली आहे.

 

 

केजरीवाल यांनी महिला सन्मान योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत दिल्लीतील आप सरकार महिलांना दरमहा 1000 रुपये देणार आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर योजनेची रक्कम दरमहा 2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे.

🤙 9921334545