मुंबई: अजित पवार यांनी आज दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. यावेळी प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ ,सुनेत्रा पवार, पार्थ पवार उपस्थित होते. या भेटीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, “आम्ही आमच्या स्वार्थासाठी चूक केली असती तर बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या नजरेला नजर देऊ शकलो नसतो. मला लाज ही वाटली असती.पण हे माझं वैयक्तिक मत आहे मी त्या नेत्यांविषयी व्यक्तिगत बोलत नाही. मी माझ्या भावना आणि आमच्या पक्षाच्या भावना सांगितल्या.
आपण या महान माणसा विरोधात प्रचार केला, चिखलफेक केली आणि परत शुभेच्छा द्यायला येत आहे. माझं मत सांगतोय महाराष्ट्राला किती आवडेल याची माहिती मला नाही. पण माझे मन झाले नसते आणि मी नजरेला नजर भिडवू शकलो नसतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले.