कोल्हापूर : तुर्केवाडी व माणगाव विभागातील ग्रामस्थांच्या वतीने आमदार शिवाजीराव पाटील यांचा भव्य ‘विजयी संकल्प’ सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आमदार पाटील म्हणाले, माझ्या या बंधू-भगिनींनी निवडणुकीत मतदानाच्या स्वरूपात तर भरभरून प्रेम दिलेच परंतु आज विजयानंतरही माझी ही आपली माणसं मला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यांचं हे प्रेम पाहून माझं मन भारावून गेले.
यावेळी भरमूआण्णा पाटील (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), शांताराम पाटील (चंदगड तालुका अध्यक्ष भाजप) दिपक दादा पाटील (मा. संचालक गोकुळ) ज्योतीताई पाटील (महिला बालकल्याण विकास समिती माजी सभापती) सचिन बल्लाळ (माजी जि. प. सदस्य) बबन देसाई (माजी सभापती) मनीषा शिवणगेकर (माजी. उपसभापती) शामराव बेनके, .सी. आर. देसाई सर, जयवंत चांदेकर साहेब (आर्मी), उदयकुमार देशपांडे, यशवंत सोनार, हरिभाऊ पाटील (आर्मी), तुकाराम बेनके, प्रताप सुर्यवंशी, अशोक कदम, जानबा चव्हाण, संदीप पाटील, तानाजी कागणकर, अमित वर्षे तसेच चंदगड मतदार संघातील माता, भगिनी व बंधू सर्वच संघनेचे पदाधिकारी व आर्मी संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते.