न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज मधील विद्यार्थिनींचा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये प्रथम क्रमांक

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)
52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळ या ठिकाणी , आयोजित केले होते. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज चा माध्यमिक गटात प्रथम क्रमांक आला. यामध्ये वाहतूक व दळण वळण या विषयांतर्गत हायवे वरील अपघात टाळणे करीता उपकरण सादर केले.

विद्यालयातील सहभागी विद्यार्थिनी कु. हर्षदा संजय गायकवाड व कु. दिशा दिलीप माने या विद्यार्थिनींचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. मार्गदर्शक विज्ञान शिक्षक सौ शेटे व्हि के, श्री कुंभार एस बी, सौ माळी एस ए सौ माळी जे एस तसेच मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

🤙 9921334545