मुंबई: महाविकास आघाडीला भाजप मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे खासदार आम्हाला भेटत असतात असे म्हटले आहे.
बावनकुळे म्हणाले,खोटारडेपणातून त्यांनी काही मत मिळाले आहेत .त्यांच्या निवडून आलेल्या खासदारांना वाटतं की काँग्रेसमध्ये राहून आमचं भविष्य चांगलं नाही.त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आणि प्रतिनिधी आम्हाला भेटत असतात.
काँग्रेसचे नेतृत्वाकडून निवडून आलेले आमदार खासदारावर दुर्लक्ष होत आहे. काही लोक अस्वस्थ आहेत असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. त्यांना त्यांची माणसं सांभाळता येत नाहीत आम्हाला ऑपरेशन करण्याची गरज पडत नाही निवडून आलेले प्रतिनिधी काँग्रेसला सांभाळ येत नाही .हे महाविकास आघाडीचे अपयश आहे .