सकल हिंदू समाज, इचलकरंजीच्या वतीने बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरुद्ध निषेध आंदोलन

कोल्हापूर :बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचार आणि साधू संतांवर होणाऱ्या अपमानजनक कारवाईच्या विरोधात सकल हिंदू समाज, इचलकरंजी शहर यांच्या वतीने विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले, तसेच हिंदू जनजागृतीचा संदेश देण्यात आला.

 

 

या आंदोलनात आमदार राहुल आवाडे यांनी सहभागी होऊन त्यांचा निषेध नोंदवला. हीच वेळ आहे, जेव्हा सर्व हिंदूंनी एकत्र येऊन एकजूट दाखवावी आणि आपला आवाज बुलंद करावा. तसेच बांगलादेशातील सर्व हिंदूना संरक्षण देण्याची मागणी राहुल आवाडे यांच्यासह राष्ट्रप्रेमी हिंदू बांधव, पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी सौ. मोसमी चौगुले यांना निवेदन दिले. या आंदोलनास सर्व राष्ट्रप्रेमी हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते