दिल्ली: भाजपा युतीचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षाने इंडिया आघाडीची स्थापना केली होती. मात्र आता या आघाडीत फूट दिसू लागली आहे .दिल्लीत पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. काँग्रेस आणि सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या आघाडीची चर्चा सुरू होती. मात्र माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस सोबतच्या आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये आम आदमी पार्टी दिल्लीत स्वबळावर निवडणूक लढणार आहे. काँग्रेस सोबत कुठल्याही आघाडीची शक्यता नाही असा खुलासा त्यांनी केला आहे. 15 जागा काँग्रेस आणि एक -दोन जागा इंडिया आघाडीतील अन्य पक्षाना दिल्या जाती,ल उर्वरित जागांवर आम आदमी पक्ष त्यांचे उमेदवार उभे करेल .अशी बातमी समोर येत आहे यावर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून या चर्चा फेटायला आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने त्यांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत 20 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.