कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा नवनिर्वाचित आमदार म्हणून शपथविधी झाल्यानंतर आमदार अमल महाडिक यांनी मतदारसंघाचा आभार दौरा सुरू केला. या अंतर्गत वसगडे इथल्या भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर वनविहार तपोवनला भेट दिली.
या ठिकाणी आचार्य 108 मयंकसागरजी महाराज, परमपूज्य 108 अर्पणसागरजी महाराज आणि परमपूज्य 108 पूर्णचंद्रसागरजी महाराज ससंघ यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
संतमहात्म्यांच्या आशीर्वादाने कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली.