मुंबई : येत्या 14 डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेत ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली. नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाच्या काही मंत्र्यांच्या शपथविधी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
14 डिसेंबरला विस्तार झाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार हे तिघेच हिवाळी अधिवेशन चालवतील आणि विस्तार जानेवारीत केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.