प्रियांका गांधी ‘मोदी – अदानी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन संसदेत

मुंबई: काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी या ‘मोदी अदानी भाई भाई’ असे लिहिलेली बॅग घेऊन संसदेत आल्या. यावेळी लोकसभेचे विरोधी नेते राहुल गांधी यांनी या बँगेचे कौतुक केले आहे.

 

 

प्रियांका गांधींनी संसदेत आणलेल्या बॅगेवर एका बाजूला नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे व्यंगचित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला ‘मोदी अदानी भाई भाई’ अशी ओळ लिहिलेली आहे. लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार, काँग्रेसचे खासदार या सगळ्यांनीच ही बॅग हातात घेतली होती. संसदेच्या बाहेर घोषणाबाजी करण्यात आली. पंतप्रधान मोदी सदनात या आणि आरोपावर उत्तर द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.