गोपीचंद पडळकरांची शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधल्या मारकरवाडी गावात महायुतीची महाविकास आघाडीच्या fake narrative विरुद्ध जाहीर सभा घेण्यात आली. जत मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे.

 

100शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. या मतदारसंघात 100 गावे आहेत पण हेच गाव निवडले कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही. हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत.असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

नरेंद्र मोदींचे खरे चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत राहुल गांधींचे खोटे गावकभर फिरून येते.तसेच देवभाऊचे खरे बाहेर पडेपर्यंत शरद पवार यांचे खोटे गावभर फिरून येते. मारकरवाडीत पवार आले तेव्हापासून शरद पवारांची अक्कल आता संपली आहे. शरद पवारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका कशा होतात याबाबत आमदारांचे प्रशिक्षण घ्यावे आणि मैदानात यावे. ईव्हीएम मध्ये घोळ कसा झाला ते सांगावे असे पडळकराने म्हटलेय.