मुंबई : 8 वर्षांपूर्वी कोपर्डीत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पीडित कुटुंबाला भेटून त्यांच्या दु:खात धीर दिला. कुटुंबीयांच्या काळजीला उत्तर देत, त्यांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतली आणि ‘या शुभ सोहळ्याला मी हजेरी लावेन,’ असा शब्द दिला.
तो शब्द त्यांनी पाळला.
नवमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लग्न सोहळ्यात उपस्थित राहून आपले वचन पूर्ण केले. त्यांच्या मनातून आलेल्या आशीर्वादांनी वधू-वराच्या आयुष्याला नवीन आशा आणि दिशा दिली. हा क्षण नुसता वचनपूर्तीचा नव्हे, तर एका कुटुंबासाठी आधाराचा, सन्मानाचा आणि विश्वासाचा होता.
नेतृत्व म्हणजे केवळ निर्णय घेणे नाही, तर दिलेल्या शब्दाने लोकांच्या मनातली जागा कायम राखणे असते हे त्यांनी दाखवून दिले.