कुंभोज(विनोद शिंगे)
किणी (ता हातकणंगले) येथील सृष्टी संजय चाळके हिची ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय येथे कनिष्ठ सहाय्यकपदी निवड झाली आहे.

सृष्टीचे कन्या विद्यामंदिर,किणी, माध्यमिक शिक्षण किणी हायस्कूल,व विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठ वडगांव, उच्च माध्यमिक शिक्षण विवेकानंद महाविद्यालय,कोल्हापूर व आण्णासाहेब डांगे महाविद्यालय आष्टा येथून शिक्षण पूर्ण करून सेट परिक्षा उत्तीर्ण झाली आहे. सृष्टीला आई वडीलासह कुटूंबाचे प्रोत्साहन लाभले .
