मोबाईल स्फोटामध्ये शिक्षकाचा मृत्यू

पुणे : गोंदिया जिल्ह्यात महिन्याभरापूर्वीच खरेदी केलेल्या मोबाईलच्या स्फोटामुळे एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

 

 

खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने त्यात गंभीर जखमी होऊन एका मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला नातेवाईक गंभीर जखमी झाला आहे. सुरेश संग्राम (वय55) असे मृत शिक्षकांचे नाव आहे , तर नत्थू गायकवाड ( वय ५६) असं जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मृत सुरेश संग्राम हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक होते. सुरेश संग्राम आणि त्यांचे नातेवाईक नथू गायकवाड हे दोघेही एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडे निघाले असताना सुरेश यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर नथू गायकवाड हे जखमी झाले. त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिन्याभरापूर्वी हा मोबाईल खरेदी केला होता.

दुय्यम दर्जाचा मोबाईल घेतला असेल आणि त्यात डुबलीकेट बॅटरी टाकली असेल तर मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे मोबाईल मध्ये बॅटरी बदलताना संबंधित कंपनीची व उत्कृष्ट दर्जाची घ्यायला हवी. असा सल्ला टेक्नॉलॉजी एक्सपर्ट यांनी दिला आहे.

🤙 9921334545