मुंबई : महायुती सरकारचा गुरुवारी आझाद मैदान येथे शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज (दि.6)राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्ण यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून आमदार कालिदास कोळंबकर यांना पद आणि गोपनियातेची शपथ दिली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
सात, आठ आणि नऊ डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपीनीयतेची शपथ देतील.
ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोलंबकर यांना हंगामी विधानसभा अध्यक्ष हे पद देण्यात आले आहे. पहिल्या दोन दिवसात नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.नऊ डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षाची निवड होईल आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल.