कोल्हापूर : इंडियन डेअरी असोसिएशनतर्फे गोकुळ दूध संघाला प्रतिष्ठित ‘बेस्ट प्रोसिजर टेक्नॉलॉजी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यानिमित्त बॉम्बे एक्जीबिशन सेंटर, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात चेतन नरके हे उपस्थित राहून गोकुळ दूध संघाचा संचालक या नात्याने हा सन्मान स्वीकारला.
प्रामाणिकपणा, जिद्द, जबाबदारी या गोष्टींमुळे गोकुळ दूध संघ आजपर्यंत यशाच्या सर्वोच्च शिखरावर कार्यरत आहे. यामुळेच गोकुळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. दैनंदिन दुधाच्या 10 लाख लिटर प्रक्रियेच्या क्षमतेसह, गोकुळ दूध संघ दुग्ध उद्योगात नवी ओळख निर्माण करत आहे. ही कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
यावेळी चेतन नरके म्हणाले, संस्थेचा संचालक या नात्याने संपूर्ण गोकुळ दूध संघाच्या वतीने पुरस्कार स्वीकारणे, हा माझा बहुमान आहे. हे यश संपूर्ण गोकुळ परिवाराच्या समर्पणाचा आणि आमच्या शेतकरी आणि ग्राहकांच्या विश्वासाचा पुरावा आहे.या यशाबद्दल संपूर्ण गोकुळ दूध संघ, दूध उत्पादित शेतकरी व ग्राहकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.