कोल्हापूर: हेरवाड आणि शेडशाल (ता. शिरोळ) येथील वेगवेगळ्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. आकाश शिवाजी लोहार (वय 32, रा. अब्दुललाट ) व संजय राघोबा गडगे (वय 50 ,रा. बुबनाळ) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. निखिल रायनाडे (रा. अब्दुललाट) असे जखमी युवकाचे नाव आहे.
अब्दुललाट येथील आकाश लोहार व निखिल रायनाडे हे निपाणीहून पाहुण्यांच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आटपवून मजरेवाडीहून अब्दुललाटकडे दुचाकीवरून जात होते. बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हेरवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोरगावहून कुरुंदवाडच्या दिशेने विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी मिनी आरामबस आडवी आल्याने बसच्या मागील चाकाला धडकल्याने आकाश जागीच ठार झाला .तर निखिल रायनाडे जखमी झाला.
शिरसाळ येथील संतोष दळवी हे ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन औरवाड कडे जात असताना रस्त्याने चालत जात असलेले संजय गडगे यांना धक्का लागून ते पडले , ट्रॉलीचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले.
या प्रकरणी ट्रॅक्टर चालक संतोष बेळवी ( रा.यल्लूर, ता.चिक्कोडी, जि.बेळगाव)यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.