कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था यांच्या वतीने श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय, आडोली, ता. राधानगरी येथे ‘कळी उमलताना’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी भागीरथी महिला संस्था व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटप करुन विद्यार्थिनींशी संवाद साधला.
कोल्हापूर पासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावर असणारे हे दुर्गम भागातील गाव आहे. या ठिकाणी 10 ते 12 किलोमीटर अंतरावरून मुलींना शिक्षणासाठी यावे लागते. याठिकाणी मूलभूत सुविधा अजून म्हणाव्या तशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी भागीरथी महिला संस्था नक्कीच प्रयत्नशील राहील, असे मत सौ महाडिक यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच वयात येताना मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल या विषयावर डॉ. अनुष्का वाईकर यांनी मुलींना मार्गदर्शन केले.
यावेळी मा. अतुल जोशी, मा. व्ही. पी. पाटील, मा. विजय महाडिक, मा. एन. एन. कुलकर्णी, मा. स्वाती कांबळे, मा. टी. डी. पाटील, मा. विमल पाटील, मा. शुभांगी मगदूम, मा. नम्रता पाटील, मा. शशिकांत पाटील, मा. नंदू शिंदे, मा. भाऊ कोगनुळकर, मा. जयवंत भालेराव, मा. सखाराम बेतम, मा. भारत पाटील, मा. सुरज महाद्रे, मा. शक्ती पवार यांच्यासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.