मुंबई : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देत असताना गृहमंत्री पद हे द्यावं अशी आमच्या सर्व आमदारांची इच्छा असल्याचे माजी मंत्री व आमदार गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
गुलाबराव पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून जनतेची सेवा केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी योजना तसेच लहानसहान निवडणुका, बैठका असल्या तरी एकनाथ शिंदे हे हजर राहिले आहेत. लोकांमध्ये मिसळलेला हा नेता असून एकनाथ शिंदे यांनी सत्तेत राहावं अशी इच्छा सर्व आमदारांची असल्याचे पाटील यांनी सांगितले.