विधानसभा निवडणुकीत खा.धैर्यशील माने यांची महत्त्वाची भूमिका- आ.राहुल आवाडे

कोल्हापूर:इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्शयील माने यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देत विधानसभा निवडणुकीमध्ये खासदार धैर्शयील माने यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.

 

 

 

तसेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार निवेदिता माने वहिनी व खासदार धैर्यशील माने यांनी पुष्पगुच्छ देऊन साहेबांचे अभिनंदन केले.

यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब चौगुले, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे संचालक सुनिल पाटील, माणगावचे सरपंच राजू मगदूम, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, माजी पाणीपुरवठा सभापती श्रीरंग खवरे, शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे, माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके, माजी नगरसेवक महादेव गौड, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, माजी नगरसेवक रवी लोहार उपस्थित होते.