कोल्हापूर: चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांचा विजय झाला . विजयांनंतर आमदार शिवाजीराव पाटील यांनी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे याच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच त्यांचा आशीर्वाद स्वीकारला.
पंचरंगी लढत झालेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्र भाजपमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी चंदगड जिंकला. चंदगड मतदार संघात बंडखोरीचा महायुती आणि महाविकास आघाडीलाही फटका बसला आहे. गेल्यावेळी थोडक्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढत शिवाजीराव पाटील यांनी विजयी झेंडा फडकवला . शिवाजीराव पाटील यांनी उमेदवार विद्यमान आमदार राजेश पाटील, महाविकास आघाडीच्या नंदाताई बाभुळकर, जनसुराज्य पक्षाचे मानसिंग खोराटे आणि अपक्ष उमेदवार अप्पी पाटील यांचा पराभव केला. शिवाजी पाटील 24,063 मतांनी विजयी झाले आहेत.