कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी ज्ञानेश्वर माऊली सजीवन समाधी सोहळ्यानिमित्त उत्तरेश्वर पेठेतील विठ्ठल मंदिर, आळंदी मठ येथे भेट दिली.
“ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम” या हरी नामच्या गजराने संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झालं. महाराष्ट्र तसेच इतर राज्यातही वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर तळागाळातील लोकांना भक्ती मार्गात घेत असुन समाजुपदेशन करण्याचे महान कार्य वारकरी मंडळींकडून होत आहे.
.