केंद्रीय मंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रातील शिवसेना खासदारांची भेट

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)

मुख्यमंत्रीपदावर शिंदेंनी दावा सोडला शिंदे गटाच्या खासदारांनी घेतली शाहांची भेटराज्यात मिळालेल्या यशानंतर महायुतीत आता मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. यातच आज एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेतून जाहीरपणे मांडली आहे.शिंदेंच्याही भूमिकेला भाजपकडून तात्काळ पत्रकार परिषद घेऊन समर्थन दिले आहे. अशातच आता शिंदेंचे खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे.

 

 

मुख्यमंत्रीपदाबाबत आता महायुतीत मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. आज दिल्लीत शिवसेना खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. विधानसभेत मिळालेल्या यशाबद्दल खासदारांनी अमित शाहांचे अभिनंदन केले. तसेच “सर्वांनी एकत्रितपणे पुढील महापालिका निवडणूका लढण्याच्या सूचना यावेळी अमित शाहांनी दिल्याची माहिती आहे. यामध्ये खासदार प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, संदीपान भूमरे, रविंद्र वायकर, राहुल शेवाळे, धैर्यशील माने, मिलिंद देवरा यांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यात दोन दिवसापासून महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. अशातच आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर लगेचच भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना काल मुख्यमंत्रीपदाबाबत फोनवरून चर्चा केली. मुख्यमंत्रीवरून मी अडसर ठरत असल्याच्या मनात कोणताही विचार करू नका. तुम्ही जो निर्णय घ्याल. तो मला मान्य असेल असे शिंदे यांनी म्हटले आहे.