ट्रॅक्टर आणि मोटरसायकलच्या धडकेत तरुण जागीच ठार

कोल्हापूर : मोटरसायकल आणि ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर यांच्यात धडक झाल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. यश संजय लोंढे (वय 20, रा. उचगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर त्याचा मित्र किरकोळ जखमी झाला. हा अपघात कागल निढोरी राज्यमार्गावरील वाघजाई घाटात झाला.

 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, यश हा त्याचा मित्र निखिल मिणचेकर याला घेऊन मळगे येथील मेहुण्याला भेटण्यासाठी चालला होता. वाघजाई घाटात उसाचा ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला, या अपघातात यशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र निखिल मिणचेकर हा किरकोळ जखमी झाला.

कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे करत आहेत.

🤙 8080365706