कोल्हापूर: भरधाव टेम्पोच्या धडकेत हुपरी येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सुनील पुरंदर गाट (वय 48, रा.सिल्व्हर झोन हुपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पंचतारांकित एमआयडीसी मार्गावरील व्यंकटेश सहकारी सूतगिरणी जवळ घडली.
सुनील गाट हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे शहराध्यक्ष तसेच रजत एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला चुकवण्याच्या प्रयत्नात समोरून आलेल्या भरधाव टेम्पोची धडक बसल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येतय. सुनील हे रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून आपल्या दुचाकीवरून सिल्व्हर झोन येथील घरी निघाले होते , दरम्यान एमआयडीसीहून हुपरी येळगुड कडे येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये सुनील यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब काट यांचे ते पुतणे होते
अपघातानंतर चालकास नागरिकांनी भावना सह पकडले होते पण गर्दीचा फायदा घेत त्यांनी तिथून पळ काढला.